LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ. खरे यांच्या कडून चळे जि.प. शाळेस मिळालेल्या संगणक संचाचे सौ. तृप्तीताई यांच्या हस्ते पूजन

दिनांक २०/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
* इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ संपन्न *
आ. खरे यांनी दिलेल्या संगणकाचे पूजन करताना तृप्ती खरे व  मान्यवर 


पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद शाळेस आ. राजू खरे यांच्याकडून ११ एप्रिल रोजी चार संगणक संच आणि एक प्रिंटर दि. २८ डिसेंबर २०२४ च्या लेखी पत्राद्वारे  मागणी केल्यानुसार प्राप्त झाला . या संगणक संच व प्रिंटरचे पूजन सौ तृप्ती ताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच   दिपक मोरे  हे होते . यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व विविध परीक्षेत यश मिळवलेल्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता .
    यावेळी कार्यक्रम समारंभाचे उद्घाटक म्हणून सौ तृप्ती ताई खरे म्हणाल्या सध्या शिक्षण हा महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण वाढीस लागावे या हेतूने शाळा व्यवस्थापन समिती, पालक सदस्य व सर्व शिक्षक यांच्या केलेल्या मागणीनुसार संगणक संच दिले असून आणि या संचाबरोबरच संगणक कक्ष प्रयोगशाळा यासाठी आमदार निधीतून सुमारे दहा लाख रुपये पेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा सौ. खरे यांनी दिले यापुढील काळातही मागणीनुसार पुरवठा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे अभिवचन दिले. कमी असलेल्या शिक्षका बाबतीतही विशेष लक्ष पुरवून त्याची पूर्तता ही आमदार श्री व सौ.खरे यांच्याकडून झाली आहे.  यावेळी केंद्र प्रमुख एम डी काळुंगे, गोपाळपूर च्या सरपंच उज्वलाताई बनसोडे, माजी मुख्याध्यापिका सौ. कल्पना जगताप भुसे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली गायकवाड , माजी मुख्याध्यापक कुबेर फुगारे, राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे संस्थापक रामदास घाडगे, श्रीराम पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक हरिभाऊ आनंदा मोरे, दत्तात्रय लक्ष्मण मोरे  उपस्थीत होते. 
या कार्यक्रम प्रसंगी आनंदयोग हॉस्पिटल तर्फे  कु. प्रणाली मोहन वाघ व कु. सिद्धी बालाजी शिंदे या विद्यार्थिनीना  "सुवर्णहरी गुणवंत विद्यार्थी" पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारात रुपये १००१ रुपये ठेव व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर श्रवण सिताराम कोळी रणजीत राहुल कुंभार, दत्ता यल्लाप्पा कांबळे, कु. श्रुती आनंद मोरे या विद्यार्थ्यांना सिद्धनाथ वाचनालय  व लोकविकास बचत गटातर्फे "गुणवंत यशवंत विद्यार्थी " व "आदर्श ग्रंथवाचक पुरस्कार" स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील दहा विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी  यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. तृप्तीताई खरे

Post a Comment

0 Comments