दिनांक ०८/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी पल्लवी बापू बनसोडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी मैना केराप्पा लवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीकृष्ण पतसंस्थेचे नवनियुक्त चेअरमन पल्लवी बनसोडे यांचा सत्कार सुमन मोरे तर व्हा.चेअरमन मैना लवटे यांचा सत्कार लता कांबळे यांनी केला. या निवडी कार्यक्रमाप्रसंगी श्रीकृष्ण ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम बनसोडे, मालन बनसोडे, नवनाथ मोरे, बालाजी बनसोडे, तसेच श्रीकृष्ण पतसंस्थेचे संचालक मंडळ, सर्व महिला वर्ग, श्रीकृष्ण महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व चळे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments