LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चेअरमनपदी श्री दर्लिंग मोरे, व्हा. चेअरमनपदी विशाल वाघ यांची अविरोध निवड ; भास्करआप्पा गायकवाड ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था चळे ता. पंढरपूर या संस्थेची ची निवडणूक अविरोध

दिनांक ०६/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क

उजवीकडून नवनिर्वाचित चेअरमन श्री दर्लिंग मोरे तर डावीकडे व्हा. चेअरमन विशाल वाघ 

पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भास्कर आप्पा गायकवाड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री दर्लिंग गोरख मोरे तर व्हाईस चेअरमन पदी श्री विशाल राजाराम वाघ यांची नुकतीच अविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. सांगोलकर यांनी जाहीर केले. 
       तत्पूर्वी संपूर्ण निवडणूकच बिनविरोध होऊन संचालक पदी दिनकर बाबासो घाडगे, बंडू निवृत्ती शिंदे, नेताजी ज्ञानेश्वर मांडवे, मारुती भानुदास मोरे, हनुमंत नागनाथ वाघ ज्ञानेश्वर शामराव वाघमोडे, सुनील मलकाप्पा कुंभार, प्रतीक दत्तात्रय शिखरे, सौ  सिंधू विष्णू गायकवाड, सौ. पद्मीनी कुंडलीत पुजारी यांची संचालक पदी अविरोध निवड झाली होती ५ एप्रिल रोजीची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक सुद्धा अविरोध झाली. या वेळी  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थापक सचिव राजाराम वाघ माजी चेअरमन  बंडू शिंदे, व्हाईस चेअरमन मंगेश मोरे, अनिल गायकवाड नवनाथ वाघमोडे, हरिबा कांबळे, नवनाथ वाघ, युवराज गायकवाड,  रामचंद्र गायकवाड, बाळु आबा मोरे ,  धनाजी वाघ ,अविनाश सुतार , प्रथमेश वाघ,  विष्णू गायकवाड,  बालाजी शिंदे सुधाकर गायकवाड,  संजय मोरे उपस्थित होते.

नवनिर्वाचित संचालक मंडळ भास्कर आप्पा गायकवाड ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था चळे .


Post a Comment

0 Comments