दिनांक २०/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
ज्ञानेश्वर कांबळे यांचा सत्कार करताना धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील प्रगतशील शेतकरी व आर्थिक गुंतवणूक सल्लागार श्री ज्ञानेश्वर आनंदा कांबळे यांची श्री सद्गुरु सिताराम महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मंगळवेढा या बँकेच्या व्हा. चेअरमनपदी नुकतीच निवड झाली या निवडीबद्दल त्यांचा धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महिला पतसंस्था चळे संस्थापक सचिव रामदास घाडगे या यांनीही सदिच्छा भेट देऊन सत्कार केला. यावेळी बंडू मोरे , प्रताप गायकवाड, आप्पासाहेब कांबळे उपस्थित होते सिद्धनाथ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अतुल मोरे यांनी शुभेच्छा व्यक्त करुन अभिनंदन केले. श्री कांबळे यांनी यापूर्वी दोन वर्षे संचालक पदावर काम केले होते असून त्यांच्या कुटुंबीयांचा व धनश्री परिवाराचा अतूट व जिव्हाळ्याचा संबंध प्रदीर्घ कालावधीपासून आहे.
0 Comments