दिनांक ०२/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे हे भीमा नदीच्या काठी वसलेलं आणि पसरलेलं महत्त्वपूर्ण गाव आहे परंतु सध्या चळे गावात पाणी प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे हा पाणी प्रश्न कित्येक दिवसापासून आहे तसाच राहिला आहे सत्ता कोणाचीही असो पण पाणी प्रश्न कायम आहे असाच निष्कर्ष आता जनता घेऊ लागली आहे. कारण गत २०- २५ वर्षापासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न जैसे थे असून याला सत्ताधारी आणि विरोधकांचं अनियंत्रित कारभार कारणीभूत असल्याचं जनतेमधूनच बोलले जात आहे.
गत सहा महिन्यापासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु ग्रामपंचायत सदस्या दिपाली युवराज गायकवाड यांच्या प्रयत्नातून काही भागातील पाणीपुरवठा स्वतंत्र नियोजनातून व स्वखर्चातून केल्याने काही प्रमाणात काही भागात सुरळीत पाणीपुरवठा चालू आहे परंतु गावाच्या निम्म्या भागात पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने महिला वर्गातून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे त्यातच ग्रामदैवत श्री दर्लिंग यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने संपूर्ण "घर स्वच्छता अभियान राबवण्यासाठी" मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक आहे परंतु ग्रामपंचायत द्वारा कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने जन आक्रोश उसळत असून आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायती वर घागर मोर्चा काढणार असा इशारा महिला वर्गातून दिला जात आहे. चळे गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची नवनिर्मिती करण्याबरोबरच जुने प्रकल्प व जुने पाण्याचे "श्रोत" नव्याने चालू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
* धूळ खात व अपूर्ण , निरूपयोगी अवस्थेतील काही प्रकल्प
१)विज वितरण ऑफिस शेजारील जमिनी लगत असणाऱ्या पाण्याच्या साठवण टाक्या पूर्णपणे बंद अवस्थेत
२)त्याचबरोबर तेथीलच पाणी शुद्धीकरण प्रकल्प हा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे.
३) मोरे वस्ती, बामणपट्टी, गायकवाड- घाडगे येथील पाणीपुरवठा व साठवण व्यवस्था अर्धवट स्थितीत, अंतर्गत पाईपलाईन व्यवस्था अर्धवट, अपुरी, काही ठिकाणी पाईपलाईन गायब असल्याची तेथील नागरिकातील चर्चा.
४) ग्रामपंचायत शेजारील व वार्ड क्रमांक पाच मधील तेथील पिण्यासाठी सुरू करण्यात आलेले फिल्टर सध्या बंद अवस्थेत.
यावर उपायोजना काय...? म्हणून ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता सत्ताधारी गटातर्फे सरपंच सौ.शालन ज्ञानेश्वर शिखरे आणि उपसरपंच सौ. मेघा दीपक मोरे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे असे सांगून सध्या पाण्याची जास्त टंचाई लक्षात घेता जिथे कमी दाबाने पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणी एक - दोन दिवसात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
तर ग्रामपंचायत सदस्या सौ दिपाली युवराज गायकवाड यांनी सांगितले की ग्रामस्थांची पाणीपुरवठ्यची अडचण लक्षात घेऊन "आम्ही आमच्या स्वतःच्या विहिरीचा ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा सु स्थितीत केला आहे त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची अडचण दूर झाली आहे परंतु संपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज असल्याचे मत व्यक्त केले".
१) पाणी पातळी खोलवर गेली असल्याचे रांझणी रस्त्याकडील पाणी पुरवठा विहीर.
२) तीस वर्षा पेक्षा अधिक कालावधीपासून बंद अवस्थेत असलेला गाव पाणी पुरवठ्याची विहीर (आड)
३) पाईपलाईन खराब व नादुरुस्त असल्यामुळे श्री दर्लिंग मंदिराकडील रस्त्याकडे असलेल्या विहिरीतील वापरात नसलेले पाणी.
0 Comments