दिनांक - २०/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील दर्लिंग यात्रेत अनेक सामाजिक कार्यकर्ते युवक मंडळे व व्यक्ती यांनी भक्तांची गरज ओळखून अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यात सक्रिय सहभाग नोंदवला
सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोफत पाणीपुरवठा
यामध्ये मोफत वाहतुकीची सेवा भारत आनंदा गायकवाड यांनी पुरवली मोफत पाणीपुरवठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा कुशाबा वाघमारे, पाणी आमचे आरोग्य तुमचे हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा जेलचे प्रो.प्रा. समाधान बर्डे यांच्यामार्फत मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. शिवतेज ग्रुप तर्फे फुलांची सजावट, मारुती कोंडीबा भुसनर यांनी अर्धा किलो चांदीचा हार भेट, यात्रा कमिटी व अन्न क्षेत्र मंडळ रक्तदान शिबीर , वृक्ष मित्र संघटना व इतर युवक कार्यकर्त्याकडून स्वच्छता मोहीम राबवली, यशस्वी कुस्त्यांचे मैदान, शामराव घाडगे मुढेवाडी येथील खिलारे जातीच्या दोन वर्षे वयाच्या वळू चे उत्कृष्ट प्रदर्शन या सर्वांचे यात्रा कमिटी तर्फे आभार मानत सुमारे सात लाख दहा हजार सहाशे दोन रुपये जमेचा तपशील तर २५९२ रुपये शिल्लकीचा तपशील सादर करत यात्रेची सांगता करण्यात आली.
यात्रेतील कुस्त्यांचे मैदान
शामराव घाडगे (मुंढेवाडी) यांच्याकडील दोन वर्षे वयाचा खिलार जातीचा वळू
0 Comments