LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे येथील दर्लिंग यात्रेत स्वेरीतील एम.बी. ए. च्या विद्यार्थ्यांनी गिरवला मार्केटिगचा धडा...!

दिनांक १४/०४/२०२५
लोकपर्व न्युज नेटवर्क



चळे येथील दर्लिंग यात्रेत स्वेरीतील एम.बी. ए. च्या विद्यार्थ्यांनी गिरवला मार्केटिगचा धडा...! 

पंढरपूर तालुक्यातील चळे येथील दर्लिंग  यात्रा महोत्सव कालावधी सुमारे चार दिवसांचा असतो यावर्षी ११ एप्रिलला प्रारंभ झाला ,  यात्रेचा कालावधीत चार दिवसाचा असल्याने अनेक वैशिष्ट्यपूर्ण 'अविष्कार' यात्रेत दिसून येत  असतात .. काही गोष्टींचा बदलत्या काळाच्या ओघात शेवट तर काही गोष्टीचा नवीन सुरुवात होत असते.. काही गोष्टींची चाचणी होत असते असाच प्रकार चळे ता. पंढरपूर येथील दर्लिंग  यात्रा महोत्सवात दिसून आला.
       तर यात्रा कालावधी जास्त दिवसाचा असल्याने अनेक व्यवसाय व व्यवसायिक दाखल होत असतात आपापला व्यवसाय करत असताना यामध्ये खेळणी विक्रेते , विविध कसरतीचे प्रयोग घसरगुंडी, पाण्यातील बोटिंग, जम्पिंग केंद्र, स्टेशनरी कटलरी उद्योग थंड पेय उसाच्या रसाचे गाडे विविध प्रकारचे ज्यूस वितरण,  बर्फाचे गोळे विक्रेते, विविध नाष्टा सेंटर चहा कॉफीचे दुकाने, नारळ विक्रेते . हे सर्व विक्रेते शिक्षित अशिक्षित कमी शिकलेली असू शकतात परंतु अनुभवाने ते व्यवसायात प्रगल्भ बनलेले असतात. परंतु मार्केटिंगच्या क्षेत्रात सध्या विक्री कौशल्य महत्त्वाचे मानले जाते हा धागा पकडून पंढरपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी भेळ आणि पाणीपुरी विक्रीचा स्टॉल उभा केला होता यातून मार्केटिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी व मार्केटिंग म्हणजे काय...? याचा उलगडा या विद्यार्थ्यांना व्हावा तसेच कोणताही व्यवसाय करण्याची तयारी असली पाहिजे याची समज होण्याच्या दिशेने ग्राहकाची मानसिकता आणि अभ्यास झाला पाहीजे व इतरांनाही नवोदीताना प्रोत्साहन मिळाले पाहिजे या हेतूने स्टॉल लावण्यात आला होता याला मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मयुरी गिड्डे, 
साक्षी देशमुख, सोनिया शिंदे, श्रेया पुरवत, वर्षा शिंदे, गौरी गायकवाड, सिद्धनाथ ताड गणेश बागल इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे व शिक्षकांचे  मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments