LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे, आंबे , तारापूर, मगरवाडीत आजपासून श्री दर्लिंग यात्रा महोत्सव ; महाराष्ट्र कर्नाटक ऋणानुबंध जोपासणारी यात्रा..

दिनांक - ११/०४/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क 


   पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे तारापूर, मगरवाडी  परिसरात श्री दर्लिंग यात्रा महोत्सव आज  ११ एप्रिल पासून   सुरवात या यात्रेचा नियोजन प्रारंभ चैत्र पाडव्यापासून झाला आहे ही यात्रा चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, रमजान ईद, च्या मिलाफात सामावलेली असून एकात्मता व शांतता  असा संदेश देणारी व महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या  सीमारेषा जोडणाऱ्या अतूट ऋणानुबंध  जोपासणारी यात्रा ठरत असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून या यात्रेला भक्तगण सामावलेले असतात एकूणच पंढरपूर तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण श्री दर्लिंग यात्रा महोत्सव मानला जात आहे. 
          या यात्रेला अनेक शतकांचा वारसा लाभलेला आहे हे त्या यात्रेच्या पाऊल खुणा व परंपरा वरून निदर्शनास येत आहे. या यात्रेचा गुढीपाडव्याला माहोल सुरवात होऊन टप्प्याटप्प्याने तो वाढत जातो आणि हनुमान जयंती नंतर    तिसऱ्या दिवशी यात्रेचा माहोल संपुष्टात येतो . चळे ता. पंढरपूर येथील फुलेकरी श्री दर्लिंग मीताबाई विवाह सोहळ्याचे साहित्य आणण्यासाठी ४ एप्रिल रोजी विजापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले होते.  विजापूर कडे जाणाऱ्या या फुलेकरांचे दोन वेगवेगळे मार्गाचे गट तयार होतात व प्रवास सुरु होतो.  पुढे पायी चालत गेलेल्या फुलेरांना समर्थन देण्यासाठी पाठीमागून नऊ व दहा एप्रिल रोजी पहाटे अनेक ग्रामस्थ विजापूरकडे दोन चाकी  अथवा चार चाकी वाहनातून प्रवास करतात नंतर दहा एप्रिल रोजी दु. दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ते परतीच्या मार्गावर असतात १० एप्रिल रोजी सुमारे दुपारी तीन वाजता आपापल्या ग्रामदैवताच्या दिशेने या तीन फुले कधी ग्रामस्थांचे परतीच्या दिशेने प्रवास सुरू होतो १० एप्रिल रोजी संध्याकाळी मरवडे (ता. मंगळवेढा) येथे हनुमान मंदिरात मुक्काम (विसावा) असतो . तेथून ११ एप्रिल रोजी पुन्हा मंगळवेढ्याकडे प्रयाण होते मंगळवेढ्यातून या चळे, आंबे, तारापूर तिन्ही गावातील फुले कराचे    मार्ग वेगवेगळे ठरतात चळे येथील मंगळवेढ्यातून मार्ग वेगळे झाल्यानंतर रांझणी ता. पंढरपूर  येथे रांझणी येथील शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूर येथून परत आलेल्या कावडीची व श्री दर्लिंग  देवाची भेट होते . त्यानंतर चळेगावचे फुलेकरी आपल्या मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री दर्लिंग - मिताबाई यांच्या विवाह सोहळ्याचे साहित्य एका शंकूच्या  त्रिकोणी अकारात बंदिस्त केले जाते आणि ते साहित्य डोक्यावरून खांद्यावरून धावत आणले जाते.    ११ एप्रिल रोजी ग्रामस्थ यात्रेकरू पाहुणेमंडळी यांच्या उपस्थितीत श्री दर्लिग मिताबाई यांचा विवाह सोहळा  संपन्न होतो. फुलेकरांच्या स्वागतासाठी व त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी फुलेकरांचे गृहणी व सर्व कुटुंब परिवार मंदिर स्थळी हजर झालेले असतात  ही यात्रा लोकवर्गणीतून संपन्न होत असल्याने ज्या त्या गावच्या यात्रा कमिटीच्या आर्थिक बजेटनुसार विविध कार्यक्रम ठरवले जातात चळे तालुका पंढरपूर येथे यात्रेनिमित्त जल्लोष आर्केस्ट्रा कोल्हापुर १३ एप्रिल रोजी कुस्त्यांचे मैदान संध्याकाळी तानाजी भोसले वाघोरीकर तमाशा व १४ एप्रिल रोजी देवाचा सबीना पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता समारंभ होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीने दिली. या यात्रेनिमित्त विविध युवक सामाजिक मंडळे यात्रा कमिटी श्री दर्लिंग अन्नक्षेत्र मंडळ , एसटी वाहतूक व्यवस्था, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, विविध गोष्टीवर लक्ष ठेवून जबाबदारी चोखपणे पारपाडत असतात.

श्री दर्लिंग मंदिर चळे ता. पंढरपूर  स्वागतासाठी सज्ज
यात्रेच्या प्रारभा पर्यंत स्वच्छतेचे काम प्राधान्याने चालू

Post a Comment

0 Comments