लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यात खासदार प्रणिती शिंदे यांना यश मिळाले असून काँग्रेस पक्षातर्फे विठ्ठलचे माजी चेअरमन भागीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात समर्थक कार्यकर्त्यातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले अनिल सावंत व पंढरपूरचे वसंतराव देशमुख कोणती भूमिका घेणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
त्याचबरोबर विद्यमान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनाही उमेदवारी जाहीर होऊन आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात निर्माण झालेला दुरावा कमी करून समेट घडवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत झाला आहे त्यामुळे हे ते मजबूत स्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments