LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी पंढरपूर तालुक्यातील १७ गावांचा दौरा केला ; सिद्धी कदम यांच्या उमेदवारीचे केले स्वागत..! इतर इच्छुक उमेदवारांच्या भूमिकेकडे लागले लक्ष.

दि. २७/१०/१४

लोकपर्व न्यूज नेटवर्क:- 
मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील जोडलेल्या १७ गावांना भेटी दिल्या. 
  

या १७ गावांना भेटी देत असताना गाव गावच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अपेक्षित मनोगत जाणून घेतले. सोडवलेल्या प्रश्नाबाबत, अपूर्ण प्रश्नाबाबत, पुढील प्रश्नाबाबत चर्चा , विचार विनिमय करण्यात आली .
       सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने त्याविषयी विचारले असता त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. कामाच्या संदर्भातील विषयावर निवडणूक लढवण्यात येईल असे ते आपल्या मनोगत म्हणाले, त्याचबरोबर इतर इच्छुक उमेदवार बाबत आपण अनभिज्ञ आहोत असे सांगितले. 

परंतु सर्व मतदारांचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे संजय शिरसागर , व कुटुंबीय ,पवन गायकवाड, उद्योजक राजू खरे,  यांच्यासह मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची भूमिका काय असेल याची उत्सुकता शिकायल पोहोचली आहे. का सिद्धी कदम ह्याच सर्वसमावेशक उमेदवार आहेत का..? यावर मतदानतून उलट चर्चा होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments