LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उमेदवारीत रोज नवे..नवे नाव ; सर्वानाच गुंतवण्याचा नवा..नवा.. डाव...!

१०/०३/२४
राजकीय 
रंग  - राजकारणाचा 


अतुल मोरे, लोकपर्व न्युज नेटवर्क/- 
लोकसभा निवडणूकीची लगीनघाई गावच्या शिवेवर येवून ठेपली आहे ती केव्हाही वेशीवर पोहचू शकते  , सोलापूर जिल्ह्यात 'सोलापूर व माढा' हे दोन लोकसभा मतदारसंघ उमेदवारीच्या घोळाने बहुचर्चित बनले आहेत. कारण  महायुतीत अर्थात एनडीए त  सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहेत आणि महाविकास आघाडीत सोलापूर काॅग्रेस कडे तर माढा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहेत. इथे या दोन्ही ही मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे भाजपकडून रोज  नवं..नव्या इच्छुक नावाची भर पडत आहे अजून फायनल कोणाचे नाही.  महाविकास अर्थात इंडिया आघाडी तही या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे सध्या सर्व सामान्यांच्या चर्चेत इच्छुक उमेदवारीत दररोज नवे... नवे नाव, सर्वच इच्छुकांना गुंतवण्याचा पक्षांचा नवा... नवा डाव.!  अशी नवी राजकीय म्हण (उखाणा) तयार झाली आहे.
     सोलापूर लोकसभा मतदारसंघात परवा भाजपचे राज्य प्रवक्ते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी मी पक्षाकडे मागणी केली आहे असे सांगून पक्षांचा अंतिम निर्णय असेल असे सांगायला विसरले नाहीत . काल पंढरपुरात कामगार  मंत्री सुरेश खाडे यांनी ही सोलापूरातून उमेदवार  दिल्यास  लढण्याचे  संकेत दिले . तत्पूर्वी गेला आठवडा माजी खासदार शरद बनसोडे, व जानकरानी उत्तम गाजवला, त्याही पूर्वी माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे, आ. विजू मालकांनी चांगलाच रंगवला तर आ. राम सातपुते, प्रा. चांगदेव कांबळे यांची नेहमीच तर मोहोळ चे क्षीरसागर कुटुंब अधूनमधून डोकावतात. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही राजाभाऊ सरवदे साठी सोलापूर तर स्वतः साठी शिर्डी मागून राळ उठवली आहे परंतु तेही अजून  वंचितच आहेत. 

           तर सोलापूर हा पूर्वीचा काँग्रेस चा बालेकिल्ला पुन्हा पुर्ववत करण्यासाठी शहराच्या मध्यातून आमदारकीची हॅट्रीक मारलेल्या. आ. प्रणिती यांनी निश्चितपुर्ण उमेदवारी समजून एक ला चलो रे म्हणून दौरा चालू केला आहे. काल मंगळवेढा तालुक्यात दुसरा दौरा केला. परंतु सोलापूर लोकसभेतून महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा शहर प्रमुख सुधीर खरटमल यांनी स्वतः व प्रमोद गायकवाड यांची इच्छुक उमेदवार म्हणून घोषित केले आहे त्याचे काय..? तर वंचित अजुन वंचितच आहे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. 
          आणि माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तीव्र इच्छुक व उमेदवारी फाईनल पर्यंत पोहोचले होते. परंतु काल परवा पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उमेदवारी दाव्या बाबत काही ठिकाणी घुमजाव केला. तर काही दिवसांपूर्वी पंढरपुरातच राष्ट्रवादी चे रामराजे निंबाळकर,  संजीव राजे निंबाळकर , यांनी पंढरपूर विभागातील व माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी च्या नेत्या समवेत चर्चा करून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे देण्याची मागणी केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ही रोज नवनवी नावे चाखळत आहेत कधी सुप्रिया सुळे, तर अभयसिंह जगताप, मधून च राष्ट्रीय समाज पक्षाचे 'जानकराचे महा'देव'  ही गत पंधरवड्यात कधी स्वबळावर, तर महाविकास आघाडीचा संभाव्य आश्रय ताज्य मानत लढण्यासाठी हर..हर.. महादेव ची गर्जना करत आहेत. माढा लोकसभा बरोबरच सांगोला विधानसभा आमचीच म्हणत आहेत. तर भाजपकडून धैर्यशील मोहिते - पाटील ही उमेदवारी बाबत मुठीत 'धैर्य ' बाळगून आहेत.  सध्या ची सर्वच नावे वगळून सोलापूर, माढा उमेदवारी बाबत भाजप नवा डाव आखत आहे काय..? हा प्रश्न मात्र घर करु लागला आहे.  रोज नव्या खासदारकी साठी इच्छुक म्हणून नवे नाव येत असल्याने नवी म्हण (उखाणा) बाजारात तयार झाली आहे. इच्छुक उमेदवारीत रोज नवे..नवे नाव; सर्वानाच गुंतवण्याचा हाच पक्षांचा नवा..नवा.. डाव..!


            

Post a Comment

0 Comments