LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे येथील ११ महिलानी 'राजकीय' आणि 'वैद्यकीय' क्षेत्रात आपला उमटवला ठसा..; सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात वाढू लागला वावर..!

०८/०३/२०२४

  अतुल मोरे/लोकपर्व न्यूज नेटवर्क 
*सलग पाचव्यांदा महिला सरपंच..! एकदा सभापती..
* वैद्यकीय क्षेत्रात पाच महिलानी ठसा उमटवला.
* सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावर वाढला.
* अंगणवाडी, मदतनिसआशा वर्कर यांचे ही कार्य उल्लेखनीय 

पंढरपूर तालुक्यातील चळे हे अनेक 'अर्था' ने घडामोडी चे गाव ओळखले जात असून नेहमीच वेगवेगळ्या , सामाजिक, राजकीय , शैक्षणिक केंद्र बिंदू बनत आहे. त्यात  महिलाही मोठ्या हिमतीने पुढे सरसावलेल्या दिसत आहेत.
           याचेच प्रतिक म्हणून सलग पाचव्यांदा महिला सरपंच म्हणून सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे  ह्या कार्यरत  आहेत, या अगोदर  चळे गावच्या पहिला महिला सरपंच म्हणून 
सौ सुनिता औदुंबर मोरे यांना बहुमान मिळाला याचे शिक्षण दहावी पर्यंत असून ही अनेक अडचणी वर मात करत ( सन 2010- 15)  कारभार संभाळला . तर पहिल्या ओ.बी. सी. प्रवर्गातील महिला सरपंच म्हणून
सौ. मीनाक्षी औदुंबर सरीक यांनी एक वर्ष( सन 2015 - 16) पदभार स्वीकारला. यानी विविध उपस्थित होणा-या प्रसंगाला सामोरे जात ठरलेला कालावधी पूर्ण केला . सन (2016- 20 ) या कालावधीत सरपंच म्हणून 
सौ . अनिता हिरालाल सरीक यांनी कामकाज पाहिले , 
चळे गावच्या चौथ्या महिला सरपंच आणि विशेष म्हणजे एका पोतराजाची नातसून म्हणून सौ. वंदना  रणजित सोनटक्के यांनी  पदभार सांभाळला (सन २०२१ते २०२३)
  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चळे येथीलच अनेक महत्तम प्रयासाने अटी अटी च्या लढतीत चळे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या  उमेदवार सौ. वर्षाराणी बनसोडे यांना  ( सन 2015 -17) या कालावधीत पंढरपूर पंचायत समिती च्या सभापती म्हणून मान मिळाला.
   त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात चळे येथील 
सौ. गीतांजली महावीर डोंगरे ह्या बी.ए.एम.एस असून दहा वर्षापासून दादासाहेब डोंगरे हाॅस्पीटल च्या माध्यमातून खाजगी सेवा बजावत आहेत तर 
सौ. वैशाली महेश्वर गायकवाड यांनी बी.एच.एम.एस  पूर्ण केले त्या गायकवाड क्लिनीक च्या माध्यमातून 15 वर्षा पासून कार्यरत असून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग आहे. 
 ऐश्वर्या जालिंदर गायकवाड( सौ. ऐश्वर्या  प्रतिक मोरे)ह्या बी.ए.एम.एस पूर्ण असून अनुभवासाठी मोहिते हाॅस्पीटल येथे कार्यरत होत्या . रोहीणी हिरालाल मोरे या ही बी. ए.एम  एस. पूर्ण असून खाजगी वैद्यकीय सेवा बजावत आहेत. आणि सौ. माधुरी सुहास मोरे ह्या एम.एस.सी. एम.एल टी.असून त्या आनंद हेल्थ क्लिनीक चळे येथे पॅथाॅलाॅजी विभाग सांभाळत आहेत . एकूणच चळे येथील ११ महिलानी राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात  योगदान पूर्ण केल्याबद्दल अभिमान वाटत आहे.
* चळे गावातील अंगणवाडी सेविका.
अनुपमा गडकर, वैशाली कुंभार, सुजाता  वाघमारे,मंजुषा कुंभार, वैशाली कुंभार, मणिषा मोरे , सिंधू निर्मळ,  नंदा कुंभार, 
* मदतनिस.
सारीका चंदनशिवे, निलम ओहळ, स्नेहल कोळी, ताई सातपुते, बाई वाघमारे, मणिषा पोरे, निशा वाघमारे.
 * चळे गावातील आशा वर्कर्स
शैलजा कुंभार, सुरेखा पवार, माया वाघमोडे, सारीका वाघमारे, शोभा माने, अनिता मस्के, सोनाली सोमदळे, सीमा गवळी 

* व्यवसायात, नोकरीत, महिलांचा सक्रीय सहभाग.
चळे येथील 150 हून अधिक महिला शिक्षिका , नोकरी,शिलाई मशीन , चार बागंडी, तीन ब्युटी पार्लर सेंटर,  चार कापड दुकान, सहा किराणा अॅन्ड जनरल स्टोअर ,सहा  मिरची कांडप, दहा शेळी पालन,  मधून व्यवसाय तर  अनेक कुटुंबातून कुटूब प्रमुख जबाबदारी संभाळत आहेत .
* चळे  गावात  बचत गटाचे एक प्रकारचे जाळे विणले जात असून मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन होऊन आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी  प्रयत्न होताना दिसत आहे. शाळा व्यवस्थापन समितीतही पुढाकार घेवू लागल्या आहेत.






Post a Comment

1 Comments

  1. खूप छान आण्णा!
    चळे गावातील महिलाही कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत, हे केवळ तालुका पाहत नसून जिल्हाही पाहतो आहे. भविष्यात अशाप्रकारचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थिनींची वाटचाल चालू आहे. वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच भविष्यात उद्योग असो, कला असो अथवा कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रांत असो, महिला नक्कीच अविस्मरणीय कामगिरी करून दाखवणार हे निश्चित!

    ReplyDelete