अतुल मोरे/ लोकपर्व न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्रात काल विविध ठिकाणी.. विविध राजकीय पक्षांच्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बैठकांच्या रेलचेलीत जागावाटपाच्या विषयावरुन काथ्याकूट झाला .
जागा बाबत रहस्यमय विचार मंथन बैठका.
संग्रहित व्यंगचित्र
निष्पण्ण मात्र कांहीच झाले नाही भाजप, शिवसेना राष्ट्रवादी, आणि सर्वांचे मित्र पक्ष विरूद्ध काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, वंचित आघाडी या सर्वांचे मित्र पक्ष अशा दोन्ही बाजूकडील सर्वच राजकीय पक्ष जागावाटपावरून अडले आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यांनी "जिंकणे" हाच प्रथम निकषाचा कानमंत्र दिला आहे. त्यानुसार जागा वाटप होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत वंचित आघाडीने मागणी केलेल्या जागांबाबत मंथन झाल्याचे सांगण्यात येवून ९ मार्चला अंतिम तोडगा निघण्याची शक्यता उबाठा शिवसेना नेते खा. राजेंद्र राऊत यांच्या कडून वर्तवली गेली आहे. एकूणच राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच घडेना..; तर महायुतीच ठरेना...! अशी परिस्थिती समोर आली आहे.
"महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा आहेत, जागा बाबत देशात उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडीत मोठे रहस्यमय विचार मंथन चालू आहे,,
0 Comments