LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे जि.प केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; उद्या महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा


अतुल मोरे/ लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पं ढरपूर  तालुक्यातील चळे जि. प. केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. एकूणच शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यासह सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी २९ हून अधिक मराठी, हिंदी , गाण्यासह लावणी नृत्यावर प्रेक्षक पालकांना ठेका धरायला लावला. 
           अंगणवाडीतील विद्यार्थी नृत्य सादर करताना 
 सर्वच कार्यक्रम रोमहर्षक ठरला ... अनेक गाण्यानी प्रेक्षकांना बक्षीसासाठी प्रेमासाठी खिश्यात हात घालायला भाग पाडले . संपूर्ण महाराष्ट्रात सहज गाण निर्माण होवून युट्यूबवर अफाट  लोकप्रियता मिळवलेल आमच्या पप्पांनी गणपती आणलाय ... तितकीच लोकप्रिय लावणी 'चंद्रा' प्रेम रतन धन पायो..जय हो..! टाच मारुनी घोड्याला.. स्कूल चले हम.  इंडियावाले.. राखू द्या मर्जी..!
        एका गाण्यात जि.प. चळे शाळेतील विद्यार्थी  
नांदण..नांदण ..रमाच नांदण , नागिण डान्स शेवटी  जन्मा आधी मारु नको ग आई..! सामाजिक समतोलाचा संदेश देणा-या गाण्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. 

"कार्यक्रमाचे  उद्घाटन विठ्ठल चे माजी  संचालक  ज्ञानेश्वर गायकवाड सरपंच सौ. शालन शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, स्वाती जाधव - नागणे  मैना काळे, सागर दांडगे, दयानंद देवळे, संभाजी माने  , दत्तात्रय शिखरे, कांतीलाल वाघमारे यांनी परिश्रम घेतले. स्वागत मुख्याध्यापिका सौ. कल्पना भुसे, एसएमसी अध्यक्ष अतुल सटाले यांनी केले.  आभार  यांनी मानले शाळेतील सर्व शिक्षक, सर्व व्यवस्थापन सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले,, 
तर उद्या १३ मार्च रोजी महिला  दिनानिमित्त माता पालकांसाठी व गावातील सर्व महिलांसाठी सकाळी ८ते ११ या कालावधीत  रांगोळी, संगीत खुर्ची, लिंबू चमच्या, व पाककला  व वेळेनुसार इतर स्पर्धा चे आयोजन केले असल्याची माहिती व्यवस्थापन समितीने दिली असून  सर्व गावातील महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments