LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

"चळे बरडवस्ती" रस्त्याला यशवंतचा हुंकार; ना. मुख्यमंत्री ग्रासयो आधार ... श्री दर्लिंग ग्रामस्थांचा प्रतिसाद...!

११/०३/२४

अतुल मोरे /लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पं ढरपूर तालुक्यातील चळे येथील प्रदिर्घ कालावधी पासून बहुचर्चित असलेला हा रस्ता नेमका केव्हा होईल... किंवा आपल्या हयातीत होईल का..? असे प्रश्नांकित वलय निर्माण झालेल्या चळे - बरडवस्ती (खरसोळी) या चार किलोमीटर  रस्त्यासाठी यशवंत हुंकार मिळाला....!  नुकताच या रस्त्याच्या कामचा प्रारंभ करण्यात आला. 
 या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आ. यशवंत  माने यांच्या प्रयत्नातून व महायुती च्या सरकार कडून ४ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मिळाला.


               या रस्त्याची कहाणी अशी की हा रस्ता उन्हाळा हिवाळा आला की हवा..हवा सा गुलाबी वाटणारा पण् पावसाळ्यात ..अवकाळी पावसात हा चार किलोमीटर चा रस्त्ता नकोसा नव्हे तर का म्हणून या भागात राहत आहोत..? असे भासवणारा..!  किंबहुना गावातील अथवा तालुका पातळीवरील सर्वच नेते आमदार.. खासदार... ग्रामपंचायत सदस्य यांना जनतेच्या अपशब्दाचा मारा सहन करावा लागणारा असा हा रस्त्याचा बहुचर्चित प्रश्न ...?
 
            पावसाळ्यातील रस्त्याचे छायाचित्र
     हा चळे ते बरडवस्ती चा रस्ता   ग्रामस्थांच्या, शालेय विद्यार्थी यांच्या वतीने रस्त्याच्या पाहणीसाठी मोहळ  विधानसभा मतदारसंघाचे  आ.  "यशवंत" माने  यांना बोलावले त्यांनी रस्ता पाहीला..... रस्त्याची दुरवस्था पाहीली... नागरीक विद्यार्थी यांची होणारी तारांबळ कसरत पाहीली. त्यानी पाहता क्षणीच रस्त्याच्या कामाची जबाबदारी स्वीकारली . विधानसभा सदस्य या नात्याने या  रस्त्याच्या कामासाठी ना. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे चार कोटी हून अधिक निधी उपलब्ध करून दिला. आ. यशवंत माने चा एक प्रकारे
  यशवंत हुंकार..;  ना. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा आधार ; अन् श्री दर्लिंग (चळे) नगरीतील सर्व ग्रामस्थांचा प्रतिसादच मिळाला...!
     या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी  जेष्ठ नेते विठ्ठल चे माजी संचालक श्री ज्ञानेश्वरबापु गायकवाड,  पांडुरंग चे जेष्ठ संचालक श्री दिनकरभाऊ मोरे, माजी उपसरपंच श्री भास्करराव मोरे, विठ्ठल चे संचालक श्री उमेश मोरे , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश मोरे, सरपंच  ज्ञानेश्वर शिखरे,  ग्रामपंचायत सदस्य  अतुल मोरे, चरणदास कोळी, दिपक मोरे, रामदास घाडगे, ज्ञानेश्वर वाघमोडे , दत्तात्रय  गायकवाड, प्रताप गायकवाड , अर्जुन गंगथडे, अतुल सटाले, कुबेर फुगारे गुरुजी, बंडु मोरे, संभाजी मोरे, संतोष मोरे,  नागनाथ गायकवाड,  धनाजी वाघमोडे, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
                    उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर 

Post a Comment

0 Comments