LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पेटत्या पाण्याच्या अपूर्ण प्रश्नाला आ. प्रणितीताई शिंदे यांनी घातली फुंकर : खासदारकी च्या निश्चितपुर्ण उमेदवारीने करु लागल्या विरोधकांना घायाळ ..? इतर नेत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष..!

०६/०३/२०२४

अतुल मोरे/ लोकपर्व न्यूज नेटवर्क:-  मंगळवेढा 
 तालुक्यातील दुष्काळ भागातील आ. प्रणितीताई  शिंदे ह्या जनतेची भेट घेऊन  पेटत्या  पाण्याच्या प्रश्नावरून त्याच  धगधगत्या समस्येला फुंकर घालू लागल्या आहेत .
                        आ. प्रणिती शिंदे 
जनतेच्या  समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरा आज बुधवार दिनांक ०६ मार्च २०२४ पासून आयोजित केले असून तो संपन्न  ही झाला  आहे . त्याची सुरुवात पाठखळ येथून करण्यात आली होती, यावेळी काही  नागरिकांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आमदार प्रणितीताई शिंदे यांनी समजावून सांगून पाठखळ गावकऱ्यांच्या बैठक घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 
        पाठखळ ता. मंगळवेढा  जनतेशी संवाद साधताना 
आम्ही राजकारणासाठी आलो नसून विरोधी पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून दुष्काळी भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. ते समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द आहोत.
ही बैठक यशस्वीरित्या पार पाडली.
           मंगळवेढा तालुक्यातील २४ गावाचा पाणी प्रश्न भिजत घोंगडे पडला आहे. तो उत्तराच्या काठावर येऊन थांबला आहे. नेमक "पाणी" कुठे मुरतय याचा उलगडा होईना . त्यामुळे त्या चोवीस गावच्या 'गरम' पाणी प्रश्नावर माणसेही तापली असून थेट आम्हाला कर्नाटक राज्यात समावेश होण्यास परवानगी द्या..! अशा आरोळ्या ठोकल्या आहेत.  मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्नाचा उल्लेख ही आ. प्रणितीताई शिंदे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता.
           विधानसभेत आ. शिंदे प्रश्न मांडताना 
   विरोधी गट कसा तोडगा काढणार...?

"आता मंगळवेढा तालुक्याचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सदस्य आ. समाधान आवताडे,  पांडुरंग चे चेअरमन माजी आ. प्रशांत परिचारक ,  याच पाण्याच्या प्रश्नाला  स्पर्श  करून  आमदारकीची हॅट्रीक  विविध पक्षाकडून मिळवलेले स्व .आ. भारत  भालके पुत्र  विठ्ठल चे माजी  चेअरमन भगीरथ भालके , विद्यमान  विठ्ठलचे  चेअरमन अभिजीत पाटील  काय भूमिका  मांडणार यांच्या उत्तराकडे जनता लक्षवेधी झाली आहे,,

Post a Comment

0 Comments