चळे प्रतिनिधी
सोलापूर सह राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची विविध विभागांच्या विविध पदांची निवड व नियुक्ती प्रक्रिया चालू असून मोठ्या प्रमाणात सक्रिय कार्यकर्त्यांना " "घड्याळ तेच.... वेळ नवी" हे ब्रीद वाक्य घेऊन पदाची संधी दिली जात आहे. त्या अनुषंगाने चळे ता. पंढरपूर येथील श्री रमेश औदुंबर मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा पार पडला . या दौऱ्या निमित्त राष्ट्रवादी चे जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले. या वेळी रामदास चौगुले, सतिश गांडुळे, मोहन गायकवाड, श्रीकांत पंडीत, राहुल मोरे, बालाजी मोरे, धनाजी वाघमारे, किरण माने, रामभाऊ मोरे, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी सत्कार आनंदोत्सव साजरा केला.
____________________________________________
** त्याच बरोबर मुळचे चळेचे असलेले सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री मोहन हणमंत मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या माहिती तंत्रज्ञान (IT ) विभागाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान IT विभागाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर नियुक्ती पत्र घेताना श्री मोहन मोरे.
0 Comments