चळे प्रतिनिधी:-
*** सोलापूर जिल्ह्यातील 'सोलापूर व माढा' या दोन मतदारसंघातील खासदारकीच्या उमेदवारीचे वातावरण अतिशय तापले आहे या वातावरणात कोणत्या पक्षाची... कोणत्या उमेदवाराची पोळी भाजणार आगामी काळ.. वेळच ठरवणार आहे. तो पर्यंत इच्छुकांच्या भाऊ गर्दीत कोण कोण.. खासदार होणार..? याची मात्र चर्चा जोरात रंगू लागली आहे.
दोन्ही पैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे इच्छुक दावेदार उमेदवारांची संख्या वाढत आहेत. सोलापूर लोकसभा हा राखीव मतदारसंघ असल्याने सध्या भाजप मधून अनेक नावे पुढे येत आहेत प्रारंभी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावा नंतर माळशिरसचे परंतू पंढरपुरात कार्यरत असणारे जिल्हा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष दोन वेळा पंढरपूर लोकसभा लढवलेले प्रा. चांगदेव कांबळे सध्या नाव प्रथम चर्चेत आघाडीवर आहे. त्याचबरोबर मोहोळ येथील गत विधानसभा लढवलेले संजयअण्णा क्षीरसागर व कुटुंबीय भाजपच्या विचारपटलावर असू शकते त्यांचे बंधु नागनाथ क्षीरसागर ( सध्या शिवसेना) यांनी ही दोन वेळा पंढरपूरची खासदारकी लढवली आहे. ऐन वेळी भाजपचे राज्य प्रवक्ते माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमलताई साळुंखे ढोबळे यांचे ही नाव पुढे येवू पाहत आहे. परंतु प्रणितीताई शिंदे व सुशिलकुमार शिंदे भाजप विरुद्ध बोलले असले तरी यांचा पत्ता अद्याप पूर्णपणें खुला झाला नाही त्या भाजपमधून मैदानात की काॅग्रेस मधून..? आ.प्रणितीताईनी आमदारकीची हॅट्रीक पूर्ण केली आहे. परंतू सध्या त्यांना लोकसभेसाठी काॅग्रेस मधून पोषक वातावरण नसल्याचे बोलले जात आहे . कारण या पूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आई उज्वलाताई शिंदे तर पिताश्री सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळा पराभव झाला आहे याचा अर्थ काँग्रेस च्या पराभवाची हॅट्रीक ( शिंदे कुटुंबातील व्यक्ती कडून पूर्ण झाली आहे) आता खासदारकीला व्यक्तीच्या पराभवाची हॅट्रीक पूर्ण होणार का..? असा संशय त्यांनाही खात आहे . (आई, बाप, मुलगी )असा चर्चितहु प्रश्न उपस्थित होत आहे. कारण त्यांच्या लोकसभा कक्षेतील सर्व आमदार (सहा पैकी पाच आमदार सध्या च्या महायुतीच्या सरकार चे आहेत) त्या स्वतःच काॅग्रेस च्या आमदार आहेत. म्हणूनच ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडा, ही जागा काँग्रेस ने लढवू नये अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील काही काँगेस पदाधिकारी यांनी कांहीं दिवसांपूर्वी केली होती.
____________________________________________
सोलापूर लोकसभेतून खासदार होण्यासाठी आ. प्रणितीताई शिंदे, आ.राम सातपुते प्रा. चांगदेव कांबळे, कोमलताई ढोबळे - साळुंखे, श्री संजय क्षीरसागर, सुधीर खरटमल, हे खासदारकीच्या उमेदवारीच्या चर्चेतील चेहरे म्हणून सध्यातरी ओळखले जात आहेत.
______________________________________________
*** तर माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या हालचाली व घडा-मोडी पहावयास मिळत आहेत. माढा लोकसभेचे वातावरण गेल्या एक दीड वर्षापासूनच तापत आहे ते तापण्यास कारणीभूत ठरलेले आमदार शिदे बंधू ..! आ. मामा व आ. दादा यांनी विद्यमान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दीड लाखापर्यंत चे मताधिक्य देण्याची केलेली घोषणा. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी केलेल्या पाठराखणी बरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गत महिन्यात हात झटकून घेवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही अजून प्रश्नांकित असल्याचे कळवते. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहीते पाटील हे ही उमेदवारी बाबत खच्चून दावा ठोकत आहेत. त्यांनी व मोहीते पाटील परीवारानी मतदार संघ पिंजून काढला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर तर - माढा-करमाळा तालुक्यात कृष्णा -भीमा स्थिरीकरण नीधी उपलब्ध झाल्या बद्दल सत्कार स्वीकारने अथवा आदिनाथ कारखाना बाबत भेटी गाठी सत्कार समारंभ चालू आहेत.
तर राष्ट्रवादी खा. शरद पवार गटाकडून माढा खासदारकी साठी इच्छुक असलेले अभयसिंह जगताप यांनी ही मध्यंतरी दौरे केले आहेत. परंतु सध्या ते विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर यांची पाठराखण करत असल्याची चर्चा आहे. आणि खा. निंबाळकर यांनी अकलूज मध्ये फत्तेसिंह माने -पाटील व कुटुंबीयांची भेट घेतल्याची चांगलीच चुळबुळ वाढली असल्याचे निदर्शनास येत आहेत. तर या पूर्वीच " विजयसिंह मोहिते पाटील व फलटण चे रामराजे नाईक निंबाळकर " यांच्या कौटुंबिक भटी वाढल्या आहेत. एकूणच खासदारकी च्या वातावरणाने चांगलाच जोर धरला आहे. त्यातच भर म्हणून काॅग्रेस कडून माढा लोकसभेसाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे..?
काही दिवसांपूर्वी माजी आ. जयवंतराव जगताप यांनी ही इच्छा प्रकट केली होती.--______________________________________________
सध्यातरी माढा मतदारसंघातून खासदार होण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर , धैर्यशील मोहीते- पाटील, अभयसिंह जगताप, माजी.आ.जयवंतराव जगताप, डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील, रामराजे निंबाळकर इत्यादी नावे चर्चेतील खासदारकीचे उमेदवार म्हणून आहेत.
____________________________________________
टिप:- "रंग - राजकारणाचा" चर्चेतील वार्ता प्रसिद्ध होणार.
संपर्क:- ९८३४७५१९२०
0 Comments