पंढरपूर प्रतिनिधी:-
* ग्राहक समितीच्या जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी सौ.अनिता राजेंद्र पंडीत.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील पंडीत दांपत्याची ग्राहक समितीच्या कार्यकारणीवर नुकतीच निवड झाली आहे . ग्राहक समिती ( महाराष्ट्र राज्य ) ची बैठक पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाली त्या वेळ विविध पदाधिकारी निवडण्यात आले. त्यामध्ये ग्राहक समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र सुरेश पंडीत तर ग्राहक समितीच्या महिला कार्याध्यक्षपदी सौ. अनिता राजेंद्र पंडीत यांची निवड करण्यात आली , त्याचबरोबर स्वप्नील शेगर (गुरसाळे) यांची प्रदेश सरचिटणीस तर नितीन नकाते (मगरवाडी) यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांना ग्राहकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन त्या निरसन कशाप्रकारे कराव्यात या बाबतीत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस अन्सर शेख,महादेव जाधव, मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष,अमित पाटील, सोमनाथ जाधव, अमित कोळेकर, अतिश जाधव,दादा सुरवसे,विजय बोबाळे इत्यादी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments