पंढरपूर प्रतिनिधी
किरण होनमाने पुळुज स्थानिक सदस्य कडून
_____________________________________
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पुळूज, येथे मोठ्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले , प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वतीचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून प्रारंभी श्री गणेश, ग्रामदैवत श्री राजा लिंगेश्वर यांच्या गाण्याने सुरुवात झाली.अतिशय सुंदर आणि बहारदार अशा प्रत्येक गाण्यास , नाटकास वेशभूषा बदलून, आलेल्या बाल कलाकारास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कौतुक व बक्षीस यासह टाळ्यांचा कडकडाटाचा प्रतिसाद मिळाला. विविध कलागुणांनी शाळेतील मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी पुळूजचे सरपंच श्री.विस्वास महाडिक, गटशिक्षणाधिकारी श्री.मारुती लिगाडे, श्री गवळी साहेब, तलाठी कुंभार इत्यादी मान्यवरांचा सत्कार गावातील प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. तसेच,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पुळूज.ता.पंढरपूर या शाळेच्या स्नेहसंमेलना निमित्त मुख्याध्यापक श्री.तुकाराम गायकवाड यांचा सत्कार ,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,श्री.रामभाऊ यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला,
----------
सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला,
------------
यावेळी सत्कार स्वीकारताना, जिल्हा संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.सरस्वती भालकेताई, मा.श्री.बाळासाहेब काळे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक, मा.श्री.नारायण घेरडे माजी संचालक,मा.श्री.बाळासाहेब धुमाळ,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष,मा.श्री.कृष्णा बाबर,तालुका पतसंस्थेचे संचालक मा.श्री.नितीन गावडे,माजी संचालक मा. श्री.गजेंद्र भालके, ज्येष्ठ मार्गदर्शक मा.श्री.शिवाजी चव्हाण,पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष मा.श्री.बापूसाहेब काळे, उपस्थित होते.
------------------------------
कार्यक्रम यशस्वी संपन्न केल्याबद्दल सर्व शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला,
_______________________
* मान्यवरांच्या मांदियाळीत स्नेहसंमेलनाचा दर्जा उंचावला
जि.प. पुळुज प्राथमिक केंद्र शाळा स्नेहसंमेलन उपस्थित मान्यवर. (वरील छायाचित्र)
श्री.सिद्धेश्वर भुई , सन्माननीय श्री.ब्रह्मदेव घाडगे (माजी केंद्रप्रमुख), सन्माननीय श्री.सिकंदर पवार सन्माननीय श्री.राजकुमार राठोड,
श्री. विठ्ठलराव टाकळे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,तलाठी,जिल्ह्यातून आलेले सर्व सन्माननीय शिक्षक,शिक्षिका व त्यांचे प्रतिनिधी, सर्व कारखान्याचे आजी माझी संचालक,पंचायत समितीचे आजीमाजी सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी सदस्य,ग्रामपंचायतचे माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,सदस्य,सचिव,वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद दवाखाना स्टॉप,पशुवैद्यकीय अधिकारी,सर्व शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग,सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, श्री.राजा लिंगेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका,स्टॉप, आमदार श्रीमंत सुधाकरपंत परिचारक विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका, मुख्याध्यापक,स्टॉप,माझे विद्यार्थी,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पुळुज,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,माजी केंद्रप्रमुख,शिक्षक,विद्यार्थी, जिल्हा परिषद केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व पुळुज गावातील, पंचक्रोशीतील सन्माननीय ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाची शोभा उपस्थित राहून वाढवली,वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.
0 Comments