LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संकटकाळात "निर्भया पथक" च होणार साथीदार...!

पंढरपूर प्रतिनिधी
संकटकाळात 'निर्भया पथकच'  विद्यार्थी - विद्यार्थीनीचा उत्तम साथीदार होवू शकतो त्यासाठी संकटाच्या छायेतील व्यक्तींचा  निर्भया पथक व दामिनी पथकाशी संपर्क व संवाद होणे आवश्यक असल्याचे मत  निर्भया पथक सदस्य अविनाश रोडगे यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर तालुक्यातील चळे येथील दर्लिंग प्रशाला व कै. भास्करअप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन करताना बोलत होते. त्याचबरोबर निर्भया व दामिनी पथकातील सदस्य श्रीयुत काळे, दामिनी सदस्या सौ. पवार यांनी विस्तृतपणे समाजातील विद्यार्थी, पालक, समाजाची भूमिका विशद केली समाजातील   प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे प्रत्येकान आपल्या जाणीवा, हक्क, कर्तव्ये जपली पाहिजेत असे विचार निर्भया - दामिनी पथकातील सदस्यांनी केले.
      घटना घडू शकेल असे संशयीत दूषित वातावरण असेल तर संपर्क साधने आवश्यक आहे.  समाजातील बालविवाह ही रोखणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे. पुन्हा विवाह होतील की नाही या भावनेने 'गुपचिप' विवाह उरकले जात आहेत. उपस्थित समाजही बघ्याची भूमिका घेत असल्याने मर्यादा येत आहेत . अशी विविध मते नोंदवण्यात आली. प्रास्ताविक सस् प्राचार्य जे. बी. गायकवाड, सुत्रसंचलन श्री लक्ष्मीप्रसाद मोहीते, आभार पर्यवेक्षक श्री भोसले यांनी मानले .  सर्व शिक्षक , विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
चळे ता. पंढरपूर येथील दर्लिंग प्रशालेत  निर्भया - दामिनी पथकातील सदस्य अविनाश रोडगे.

समोर प्रशालेतील  विद्यार्थी - विद्यार्थीनी

Post a Comment

0 Comments