पंढरपूर नगरपालिकेने नुकतेच चौक सुशोभीकरण योजनेतून पंढरपूर शहरातील महत्त्वाच्या चौकातून वारकरी वेशातील पुतळे बसवून "वारी माझी भाग्याची" या अनुभूती देण्या बरोबरच ज्या चौकात हे पुतळे बसवले आहेत ते चौक आकर्षणाच्या केंद्र बिंदू बरोबरच सेल्फी पाॅईट बनले आहेत .
नगरपालिकेने सध्या शहरात तीस पुतळे बसवले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विठ्ठल मंदिराच्या दिशेने व ओढीने निघालेले वारकरी वेशातील पुतळे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर इंदिरा गांधी चौक, अहिल्या चौक, सावरकर चौक, स्टेशन रोड परिसरासह इतर महत्त्वाच्या रहदारीच्या चौकात पुतळे बसवले आहेत. त्यामुळे या सर्व चौकात नाविन्यपूर्णता भरल्यासारखे वाटू लागले आहे. जसा कोल्हापूर जिल्ह्यातील "कणेरी" मठावर बारा बलुतेदार, ग्राम संस्कृती , जत्रा, जुने गाव, चावडी, पाटील , पारकट्टा , असे दर्शन घडते . तसा काहीसा भास निर्माण होत आहे. एकूणच काय..! सध्यातरी पुतळे आकर्षक पणाबरोबर लक्ष वेधून घेण्याबरोबरच बहुतांश प्रत्येक पर्यटकांना व विठ्ठल वारकरी भक्तांना सेल्फी पाॅईट ठरत आहेत हे मात्र निश्चित.
फोटो -
१)छत्रपती महाराज चौकात वारकरी वेशातील पुतळ्यांचे निरक्षण करताना सेल्फी काढताना पर्यटक ( कर्नाटक)
*२) पंढरपुर शहरात नगरपालिकेने चौक सुशोभीकरण योजनेतून विविध चौकातील वारकरी वेशातील पुतळे.
(इंदिरा गांधी चौक)
0 Comments