मंगळवेढा तालुक्यातील एक समाजसेवी संस्था म्हणून भरीव योगदान देत असलेली झेप सामाजिक संस्था मंगळवेढा, या संस्थेच्या वतीने समाजातील आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विविध पुरस्कार झेप सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येवून गौरवण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा धनश्री परीविराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. राजेंद्र जाधव, छत्रपती परिवाराचे श्री. सुरेश पवार गुरूजी , ज्ञानदीप संस्थेचे संभाजी सलगर, बालाजी शिक्षण संस्थेचे उत्तमसिंग रजपूत, अमरसिंह राजपूत या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
* पुढील व्यक्ती व संस्थांना झेप सन्मान सोहळ्यात गौरविण्यात येणार.
_____________________________________
श्री सिद्राम बापू यादव, श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नर, सिध्दनाथ विद्यालय लेंडवे -चिंचाळे, सौ. परीणिता दगडू फटे, श्री मल्लिकार्जुन देशमुखे, श्री.दत्तात्रय नारायण येडवे, श्री. संजय तुळशीराम बिदरकर, श्री. शिवकुमार सिद्रमय्या स्वामी, सौ. सुवर्णा महादेव साळुंखे, सौ.स्मिता प्रविण जडे, श्री.राकेश औदुंबर गायकवाड, सौ. पुष्पांजली भुमिकांत चौगुले .
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन झेप संस्थेचे राहुल रजपूत, भारत घुले, श्रीकांत मेलगे, बसवराज पाटील, महेशा अरकेरी, सचिन घुले, अश्विनी मेलगे, पुंडलिक पवार, संतोष आसबे, विश्वजीत साठे, अनुजा चौगुले -सोनगे यांनी केले.
0 Comments